शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी कडून पोलिसांना रक्षाबंधन

जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी राबवला जातो उपक्रम
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी कडून, समाजाचे बंधुवत रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून औक्षण करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक निलम सावंत, तालुका संघटक माधवी दळवी, उपसंघटक संजना कोलते, उपशहर संघटक दिव्या साळगावकर आदी उपस्थित होते.