कणकवली न्यायालयाचा निकाल सत्र न्यायालयाकडून कायम

विनयभंग प्रकरणातील निकाला विरुद्धचे अपिल फेटाळले

संशयित आरोपीच्यावतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद

तालुक्यातील एका विवाहित महिलेशी मैत्री संपदीत करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. तसेच तीला बदनामीची धमकी दिल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपी अनंत जानू गुरव रा. वाघेरी याची निर्दोष मुक्तता केल्याचा निर्णय अतिरीक्त सत्र न्यायाधिश क्र. १ सानिका जोशी यांनी कायम करत सरकारपक्षाचे अपिल फेटाळून लावले. आरोपीच्यावतीने ॲड.उमेश सावंत यांनी काम पाहिले.
सप्टेंबर २०१५ मध्ये फिर्यादी ही रानात एकटी असल्याची संधी साधत आरोपीने तिच्या मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न करून शारिरीक स्पर्श करतं जमिनीवर पाडले. तसेच ती दाद देत नसल्याने तीला शिवीगाळ करत बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी कणकवली पोलीसात दाखल फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ अ. (१) ३५४ ब., ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन खटला चालला होता. या खटल्यात पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या होत्या. न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती.
त्यानंतर सरकारपक्षातर्फे सदर निकालविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन कणकवली न्यायालयाच्या निकालात कोणताही बदल करणे आवश्यक नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने अपिल फेटाळले.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!