पडेल ग्रामपंचायतचे उपसरपंच भाजपामध्ये

आमदार नितेश राणेंनी केले स्वागत

विकासाला आमदार नितेश राणें शिवाय पर्याय नाही

पडेल ग्रामपंचायतीचे उपसरपंच, उबाठा सेनेचे श्री.विश्वनाथ पडेलकर, व्यापारी संघटना अध्यक्ष श्री.जयेश तानावडे यांनी माननीय आमदार नितेश
राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पडेल ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे. या ग्रामपंचायतीवर सरपंच भाजपाचा आहे. मात्र आता उपसरपंच ही भाजपाचा असल्याने पडेल गावावर भाजपाची निर्विवाद सत्ता निर्माण झाली आहे.
त्यांच्यासोबत जगन्नाथ पडेलकर, सुदीप वारीक, सचिन पडेलकर, महादेव तानावडे, सतीश तानावडे ,दीशात तानावडे, अक्षय तानावडे, चिराग तानावडे, निखिल तानावडे, स्वप्निल तानावडे सुदीप वारीक, मंगेश येदृक, अरुण पाटणकर, नंदकिशोर वारीक, संतोष तानावडे यांनीही प्रवेश केला आहे.
आमदार नितेश राणे गाव विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आमदार नितेश राणे यांच्या शिवाय पर्याय नसल्याचे मत प्रवेश कर्त्यांनी व्यक्त केले आहे.

देवगड प्रतिनिधी

error: Content is protected !!