आता विशाल परब झाले अधिकृत सावंतवाडीकर! निवडणूक आयोगाने केले होमग्राउंडवर शिक्कामोर्तब!!

चराठे येथील “भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मतदार केंद्रा”चे ठरले मतदार!
भारतीय जनता पार्टीने युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर पुढच्या कालावधीत विशाल परब यांनी आपल्या होमग्राउंड असलेल्या सावंतवाडी मतदारसंघात आपल्या कामाचा चांगलाच ठसा उमटवला. त्यांच्या झंजावाताने सावंतवाडी मतदार संघात अनेक राजकीय चर्चा होऊ लागल्या होत्या, मात्र त्याचवेळी विरोधकांनी ते सावंतवाडी मतदार संघातील नसल्याचा मुद्दा उगाळला होता. मात्र, निवडणूक आयोगाने विरोधकांच्या मुद्द्याला एकप्रकारे सणसणीत चपराक देत, विशाल परब यांच्या चराठे येथील घराचा पत्ता असलेले आयोगाचे अधिकृत निवडणूक कार्ड बहाल करत त्यांना अस्सल सावंतवाडीकरच असल्याची मान्यता दिलेली आहे. हे कार्ड हाती पडताच, खुद्द विशाल परब यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत, निवडणूक आयोगाने आपल्या विधानसभा 270 -सावंतवाडी मतदारसंघात केलेल्या कामाला मान्यता देत भविष्यातील कार्यासाठी दिलेल्या या शुभेच्छा असल्याचे म्हंटले आहे.
मागील काही कालावधी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, तसेच खा.नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात केलेल्या अनेक समाजसेवी कामांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. युवा मोर्चाच्या सावंतवाडी कार्यालयात येणाऱ्या लोकांच्या अडीअडचणीत त्यांना मदत करण्याचे व्रतच त्यांच्या कामातून दिसून येत आहे. मतदारसंघात दोडामार्ग, सावंतवाडी, बांदा, आंबोली, वेंगुर्ले या सर्वच ठिकाणी व्यावसायिक छत्र्यांचे वाटप, नागरिकांना पावसाळ्यातील छत्र्यांचे वाटप, शाळकरी विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप, अंध अपंगांना मदत आदी कामातून त्यांनी मतदारसंघातील लोकांचे मन जिंकले असल्याचे सहज जाणवते. भविष्यात त्यांच्यावर पार्टी मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची चर्चा असतानाच, आज निवडणूक आयोगाच्या यादीत त्यांची सावंतवाडीकर म्हणून नोंद झाल्याने या मतदारसंघातील नागरिक व पदाधिकारी यांनी आमचे विशाल परब आता निवडणूक आयोगाच्या मान्यतेसह “आपला माणूस” झाल्याचे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.





