आचरा सरपंच जेराँन फर्नाडीस यांची तत्परता

पिरावाडी यथे पाणी निचरयासाठी तातडीने जेसीबी दिला उपलब्ध करुन
आचरा–अर्जुन बापर्डेकर
गुरुवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाचाफटका आचरा पिरावाडी भागाला बसला. याभागातील सात ते आठ घरात पाणी घुसल्याने धोका निर्माण झाला होता. याबाबत माहिती मिळताच सरपंच जेराँन फर्नाडीस, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर यांनी भेट देत निचरा न होणारया पाण्याला वाट करुन देण्यासाठी तातडीने जेसीबी उपलब्ध करुन दिला. जेसीबी च्या सहाय्याने पाणी वाहून जाण्यासाठी वाट मोकळी करुन दिल्यामुळे पिरावाडी भागातील पाणी घुसलेल्या घरांचा धोका टळला. सरपंच जेराँन फर्नाडीस ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर यांनी दाखवलेल्या तत्परतेने पिरावाडी भागातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला. त्यांच्या या तत्परतेबद्धल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.





