आचरा देवूळवाडी पर्यावरण प्रेमी ग्रामस्थांतर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण

आचरा–अर्जुन बापर्डेकर
वृक्ष मानवाशिवाय जगू शकतात वृक्षांशिवाय मानवी जीवन अशक्य याउक्तीस अनुसरून पर्यावरण संवर्धनाची जागृती व्हावी,मोकळ्या स्मशानभूमी परीसरात वृक्ष वाढ व्हावी या उद्देशाने देवूळवाडी पर्यावरण प्रेमी ग्रामस्थांकडून आचरा देवूळवाडी स्मशान भूमीत चाळीस आंबा रोपांची लागवड केली गेली. .ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, सामाजिक कार्यकर्ते सदानंद घाडी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले.यावेळी देवूळवाडी पर्यावरण प्रेमी रोहिदास पेंडूरकर,अर्जुन बापर्डेकर, परेश सावंत, अनिकेत मुकुंद घाडी, रुपेश घाडी,उदय घाडी,संजय शिर्सेकर,दिपक मेस्त्री, महेश पुजारे,प्रकाश आडवलकर, आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!