जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण

प्रमोद मुद्रस, अमित मांजरेकर, भावेश कर्ले यांच्या माध्यमातून करण्यात आली वृक्षलागवड
‘वृक्षसंपदा हीच खरी धनसंपदा’असा वसा घेत आणि ध्यास जपत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१प्रशालेच्या आवारात प्रमोद मुद्रस, अमित मांजरेकर, भावेश कर्ले यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. रवींद्र जठार -(माजी वित्त व बांधकाम सभापती),दिलीप तळेकर ( माजी सभापती पं. स कणकवली) यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी सरपंच -माधवी मण्यार,अरूण कर्ले(माजी अध्यक्ष शाळा व्यव.स.),प्रशांत धावडे (ग्रामपंचायत सदस्य),सतीश कर्ले(अध्यक्ष शाळा व्यव.समिती) सच्चिदानंद तळेकर,तुषार मांजरेकर,अमोल कर्ले,वैभव कर्ले,साक्षी आंबेरकर,अनिता पाटकर(मुख्याध्यापिका)सर्व शिक्षक,
नडगिवेतील ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. प्रमोद मुद्रस (सामाजिक कार्यकर्ते),अमित मांजरेकर (माजी सरपंच नडगिवे ), भावेश कर्ले यांच्या दातृत्वातून ही वृक्ष संपदा प्रदान करण्यात आली.यामध्ये कल्पवृक्ष (नारळ) बदाम, लिंबू, पेरू त्याचप्रमाणे अनेक शोभिवंत फुलझाडांचा समावेश होता. वैश्विक तापमान वाढीमुळे सारे विश्व अनेक पर्यावरणीय समस्यांना सामोरे जात आहे . वसुंधरेचं हिरवं रुप अबाधित राखण्यासाठी वृक्ष लागवड फार गरजेची आहे.असे मौलिक विचार मान्यवरांनी या प्रसंगी मांडले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण