आषाढी एकादशी निमित्त पळसंब येथे विविध कार्यक्रम

आचरा–अर्जुन बापर्डेकर
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई देवालय समिती पळसंब वरचीवाडी तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी 7.30वाजता नित्य पुजा.सकाळी 9वाजता गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या हस्ते शासकीय पुजा.दुपारी दोन वाजता गुरुवर्य कमलेश मेस्त्री शिष्य वर्गाकडून भजन संध्या कार्यक्रम सादर होणार आहे.सायंकाळी पाच वाजता सोहंम चिंदरकर,प्रणव चिंदरकर यांचा अभंगवाणी कार्यक्रम सादर होणार आहे. पखवाज साथ वेदांत चिंदरकर यांची लाभणार आहे. सायंकाळी सहा वाजता श्री रामेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ त्रिंबक बुवा सौ माधुरी त्रिंबककर यांचा भजनाचा कार्यक्रम सात वाजता स्थानिक भजने आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!