तिवरे येथील नळ योजने करिता जलजीवन मिशन अंतर्गत 85 लाखांचा निधी मंजूर
कामाचा सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ
कणकवली : कणकवली तालुक्यातील तिवरे येथील नळ योजने करिता जलजीवन मिशन योजने अंतर्गत 85 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी तिवरे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र उर्फ भाई आंबेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच रामचंद्र वाळवे तसेच ग्रामपंचायत सदस्य सुजाता गुरव, निलेश परब, राजू चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी निलेश चव्हाण, किशोर देसाई, उपस्थित होते. सुरेश गोविंद कदम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गावातील श्री. शंकर राणे, रमेश गोसावी, चंद्रकांत कदम संजय कदम वैभव महाडेश्वर देवेंद्र तेली प्रणय गुरव सुभाष गुरव अशोक परब संतोष वाळवे योगेश चव्हाण व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर / कणकवली