असलदे गावात चोरट्यांचा धुमाकूळ
दोन मंदिरांसह, प्राथमिक शाळेची वर्गखोलीचे कुलूप फोडले
कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे येथील श्री. देव रामेश्वर मंदिर व डामरेवाडी श्री साई मंदिरतील दानपेटी फोडत चोरट्याने चोरी केली. त्याचबरोबर असलदे गावठाण येथील प्राथमिक शाळांच्या वर्ग खोल्या फोडून कपाट चे लॉक उचकटून चोरीचा प्रयत्न चोरट्याने केला आहे. घटनास्थळी थोड्याच वेळात पोलीस दाखल होणार आहेत.
दरम्यान,शाळेतील शिक्षक व विद्यार्थी शाळेत आल्याने दरवाजा,कपाटे फोडलेल्या अवस्थेत दिसली.त्यामुळे चोरी लक्षात आले आहे.विशेष म्हणजे चोरट्यांनी शाळेच्या एका वर्ग खोलीत दारू पिऊन बॉटल त्याच ठिकाणी टाकली आहे.मंदिर व शाळांमध्ये चोरी झाल्याचे वृत्त समजतात घटनास्थळी असलेले सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब,तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,पोलीस पाटील सावित्री पाताडे,ग्रामपंचायत सदस्य आनंद घाडी,अनिल नरे, महुल घाडी,श्यामु परब यांच्यासह ग्रामस्थ दाखल झाले आहेत.
दिगंबर वालावलकर / कणकवली