विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पिराजी कांबळे यांचे डीएसएम परिक्षेत यश

संस्थाचालकांकडून पिराजी कांबळे यांचे कौतुक
कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीचे मुख्याध्यापक पिराजी जिवबा कांबळे यांनी शैक्षणिक व्यवस्थापन पदविका परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. बॅ नाथ पै बीएड महाविद्यालय कुडाळ या अभ्यास केंद्रातून त्यांनी ही परीक्षा दिली होती. मार्गदर्शक प्राचार्य धावडे सर प्रा . मर्गज सर प्रा . नितीन बांबर्डेकर सर प्रा नागेश कदम सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले . शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थापनशास्त्र ही पदवीका महत्वाची आहे प्रत्येक शाळा प्रमुखाने या पदवी परिक्षेचा सखोल अभ्यास केला तरच शिक्षण क्षेत्राचा कायापालट निश्चितच होईल प्रत्यक्ष व्यवहारी जीवनात शालेय व्यवस्थापन या विद्याशाखेच अभ्यास महत्वाचा ठरलेला आहे . या पदविका परिक्षेचा अभ्यास मुख्याध्यापकांचा आत्मविश्वास दृढ करणारा आहे तसेच शैक्षणिक प्रमुख म्हणून प्रत्यक्ष कामकाज पहातांना व्यवस्थापन शास्त्राचा मौलिक ठसा उमटवून शिक्षण हे समाजाभिमुख करता येते एवढा आत्मविश्वास बॅ नाथ पै बीएड महाविद्यालयातील मार्गदर्शक गुरुवर्या कडून मिळला आहे . या शालेय व्यवस्थापन पदविकेचा माझ्या शिक्षण संकुलनात उपयोग करून विद्यार्थी व समाज यांच्या विकासासाठी प्रयत्न करेन माझ्या या यशाबद्दल विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल विद्यामंदिर प्राथमिक विभागातील माझ्या सर्व सहकारी यांनी अभिनंदन केले तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री तवटे, चेअरमन डॉ सौ साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू यांनी विशेष अभिनंदन केले .
कणकवली प्रतिनिधी