रामेश्वर सार्वजनिक वाचनालय आचरा कडून मालवण देवगड तालुक्यातील सात वाचनालयांनामोफत पुस्तके भेट

आचरा–अर्जुन बापर्डेकर
आपल्या कडे असलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा इतर वाचनालयांना द्यावी त्यांच्या ज्ञानदानाच्या कक्षा रूदाव्यात या उदात्त हेतूने रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा तर्फे मालवण देवगड तालुक्यातील सात वाचनालयांना मोफत ग्रंथ भेट योजना राबविण्यात आली. याचा शुभारंभ सरस्वती वाचनालय चिंदर येथून करण्यात आला.

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर ग्रंथालय भेट आणि पुस्तकं भेट उपक्रमातर्गत एकशे तीस ते 135 पुस्तके भेट देण्यात आली
चिंदर येथे झालेल्या कार्यक्रमात
देवी सरस्वती वाचनालय उपाध्यक्ष संतोष पाताडे, कार्यवाह हेमांगी खोत, कार्यकारिणी सदस्य हिमाली अमरे, गोपाळ चिंदरकर, प्रकाश खोत, विवेक परब, ग्रंथपाल स्वरा पालकर, भूषण दत्तदास यांसह रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश परुळेकर, विरेंद्र पुजारे, भिकाजी कदम, ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समिती सदस्य वर्षा सांबारी, कर्मचारी महेश बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण. आदी उपस्थित होते.
रामेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे पहिल्या टप्यात मालवण तालुक्यातील चिंदर, त्रिंबक, बांदिवडे, माळगांव, कट्टा येथील वाचनालयांना मोफत पुस्तक भेट देण्यात आली. तर दुसरया टप्यात आचरा काझीवाडा,हिंदळे येथील वाचनालयांना मोफत ग्रंथ भेट देण्यात येणार आहेत. रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या या उपक्रमाचा त्रिंबक गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, कार्यवाह प्रशांत मेहंदळे,
माळगांव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालयाचे अरुण भोगले,गुरुनाथ ताम्हणकर,शंकर चव्हाण,बँ नाथ पै वाचन मंदिरअध्यक्ष बापू तळवडेकर ग्रंथपाल सुजाता पावस्कर आदींनी उपस्थित राहत कौतुक केले.

error: Content is protected !!