ध्येय निश्चित करून यश संपादन करा–अशोक कांबळी

आचरा–अर्जुन बापर्डेकर
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चितीतून कठोर मेहनतीने यश संपादन करून आपल्या शाळेचा, गावाचा नावलौकिक करण्याचे आवाहन जेष्ठ नागरिक सेवा संघ आचराचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी केले.
जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत जेष्ठ नागरिक सेवा संघाचे बाबाजी भिसळे,सुरेश गांवकर,जेएम फर्नांडिस, मनाली फाटक यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळीमराठी,इग्रजी, गणीत,विज्ञान, समाजशास्त्र या विषयात केंद्रात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना ही रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.