कृषी दिनानिमित्त आचरा ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपण

आचरा–अर्जुन बापर्डेकर
आचरा ग्रामपंचायती तर्फे कृषी दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, पत्रकार अर्जुन बापर्डेकर,लोकमान्य सोसायटीचे मोर्वेकर, मिराशी,ग्रामपंचायत सदस्य श्रृती सावंत,पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब,गिरीशआपकर,आदी उपस्थित होते.़
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन साजरा केला जातो.आचरा ग्रामपंचायती तर्फे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला





