दारिस्ते ग्रामस्थांनी लक्ष वेधताच उत्तम लोकेंकडून स्वखर्चातून केले काम

बेनामी ठेकेदारीमुळे दारिस्ते गावच्या रस्त्याची दुरावस्था

उत्तम लोके यांचे ग्रामस्थांनी मानले आभार

ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे आणि ग्रामपंचायतच्या गचाळ कारभारामुळे गाव च्या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून त्यामुळे दारिस्ते गावची बससेवा ठप्प पडली आहे. याची ग्रामपंचायत मध्ये वारंवार तक्रार देऊन सुध्दा काहीही पाऊल उचलले गेले नाही. त्याच ग्रामस्थांनी युवासेना तालुकाप्रमुख कणकवली उत्तम लोके यांच्या जवळ या बाबत तक्रार केल्यावर दुसऱ्याच दिवशी स्वखर्चाने खडी टाकून बस दारिस्ते गावात बस परतवण्यासाठी जागा तयार करून दिली. त्या बद्दल सर्व ग्रामस्थांनी उत्तम लोके यांचे आभार मानले. काहींना दारिस्ते गाव निवडुकापुरता दिसतो. पैशा मधून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि सत्तेतून मस्ती अश्या राजकारण्यांना काय माहिती ग्रामीण लोकांचे काय हाल होतात ते असा टोला लोके यांनी लगावला. यावेळी उत्तम लोके यांनी बेनामी ठेकेदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि स्थानिक आमदार यांच्या वर टीकास्त्र सोडले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!