कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गोंधळलेले

इंडिया आघाडी चा मित्र पक्ष आप च्या जिल्हाध्यक्षांची टीका

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंडिया आघाडीमध्ये कुरबुरी उघड

कणकवली – कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आम आदमी पक्ष सिंधुदुर्गात तटस्थ राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी म्हटले आहे. निवडणुकीला काही तास उरले असतानाच महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर हे निवडणुकी आधीच गोंधळलेले आहेत, त्यामुळे अद्यापही मतदारांपर्यंत पोहोचता आलेले नाही असेही विवेक ताम्हणकर म्हणाले.कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाचे रमेश किर मैदानात आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किर हे ज्या ताकदीने निवडणूक मैदानात उतरायला हवे होतो तो धडाका त्यांच्यात दिसत नाही. इंडिया आघाडीचे समर्थ पाठिंबा असलेल्या कीर यांनी आप सारख्या लोकप्रिय पक्षाच्या पदाधिकाऱ्याना या निवडणुकीत साधे विश्वासातही घेतले नाही. कुडाळ येथे आघाडीतील पदाधिकाऱ्याणाभेटायला आलेले कीर ओळख सांगूनही आमच्याशी साधे दोन शब्द बोलू शकले नाहीत असेही ताम्हणकर यावेळी म्हणाले.कोकणात आधीच लोकसभा निवडणुकीत आघाडीचा पराभव झालेला आहे. अशावेळी सर्वांनी एकजूट दाखवणे महत्वाचे असताना पदवीधर मतदार संघातील उमेदवार नेमक्या कोणत्या गैरसमजात आहेत हे समजत नाही. ही निवडणूक कीर हे नेमके जिंकण्यासाठी की हरण्यासाठी लढत आहेत हेच समजत नाही. हरायच होत तर निवडणूक रिंगणात का उतरलात असे विचारतानाच त्यापेक्षा शिवसेनेच्या उमेदवारांनी चांगला लोकसंपर्क आणि मतदारांशी संवाद साधला होता त्यांना तरी उमेदवारी मिळाली असती तर मोठी चुरस निर्माण झालेली आज पाहायला मिळाली असती असेही ताम्हणकर म्हणाले.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!