कुरंगवणे आणि चिंचवली जि.प.शाळेला खासदार नारायण राणे यांच्या हस्ते संगणक संच प्रदान ….

नारायण राणे यांचे समर्थक विजय घरत यांचे सौजन्याने संगणक भेट

कुरंगवणे व चिंचवली या गावातील प्राथमिक. जि.प. शाळेला सामाजिक कार्यकर्ते तसेच नारायण राणे यांचे समर्थक विजय घरत साहेब यांच्या सौजन्याने देण्यात आलेला संगणक संच (लॅपटॉप) माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांच्या शुभ हस्ते नुकताच कुरंगवणे गावचे सरपंच
श्री पप्पू ब्रम्हदंडे व चिंचवली गावचे सरपंच श्री अशोक पाटील यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
खासदार नारायण राणे हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज खारेपाटण विभगातील कार्यकर्त्यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.व त्यांचे माजी जि.प सदस्य रवींद्र जठार यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी कुरंगवणे – बेर्ले सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,उपसरपंच श्री बबलू पवार,चिंचवली सरपंच श्री अशोक पाटील,तळेरे उपसरपंच श्री शैलेश सुर्वे,खारेपाटण येथील भाजप कार्यकर्ते शेखर कांबळी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण विभगातील कुरंगवणे व चिंचवली या गावातील दोन जि.प. शाळांना संगणक संच खासदार नारायण राणे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

error: Content is protected !!