सिंधुदुर्गात १९ जून पासून पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी परिक्षा.

पोलीस अधीक्षकांची माहिती; १४२ पदांसाठी ८ हजार ४२ अर्ज…
सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या पोलीस दलात रिक्त असलेल्या १४२ जागांसाठी ८ हजार ४२ अर्ज दाखल झाले आहेत. या भरती प्रक्रियेतील मैदानी परीक्षा १९ जून पासून पोलीस दलाच्या सिंधुदुर्गनगरी येथील परेड मैदानावर होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. डिसेंबर २०२३ अखेर रिक्त असलेल्या पोलीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये ११८ शिपाई पदांचा समावेश असून २४ चालक पदांचा समावेश आहे. शिपाई पदांमध्ये पाच जागा बँड पथकाच्या आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने ५ मार्च २०२३ पासून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जातील छाननी करून शिपाई पदांसाठी ५ हजार ९२० अर्ज पात्र ठरले आहेत. तर चालक पदांसाठी एक हजार ३३९ अर्ज पात्र ठरले आहेत. एकूण ८ हजार ४२ अर्ज पात्र ठरले आहेत, असे यावेळी पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी सांगितले. मैदानी परीक्षा १९ जून ते १ जुलै या कालावधीत पोलीस परेड मैदानावर होणार आहे. यामध्ये पुरुषांसाठी उंची, छाती, १६०० मीटर धावणे, गोळा फेक, १०० मीटर धावणे. महिला उमेदवारांसाठी उंची, १०० मिटर धावणे, ८०० मिटर धावणे, गोळा फेक आदी परीक्षा घेतली जाणार आहे
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.





