कणकवलीत नारायण राणेंच्या अभिनंदन चे बॅनर झळकले

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून राणेंचा “निश्चयाचा महामेरू” टॅगलाईन खाली बॅनर

भाजपा कार्यकर्त्यांकडून कणकवलीत मोठा जल्लोष

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होत असतानाच त्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भाजपाकडून मोठा जल्लोष साजरा सुरू करण्यात आला आहे. त्यातच कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी “निश्चयाचा महामेरू” या टॅग लाईन खाली केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा बॅनर देखील कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी लावला आहे. राणे सायंकाळपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यापूर्वीच राणेंच्या स्वागताची जय्यत तयारी भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली असून, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा कणकवली पटवर्धन चौकातील “निश्चयाचा महामेरू” या टॅगलाईन खालचा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!