बोरो नाटकाचा प्रयोग व नवीन नाटकाच्या तालमीचे उद्घाटन

या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्या असे करण्यात आले आहे आवाहन

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या आगामी नाटकाची तयारी सुरू झाली आहे. फ्लेमिंगो गोवा या आगळ्या-वेगळ्या नाट्यसंस्थेचे संस्थापक सदस्य, ज्येष्ठ रंगकर्मी, बोरो आणि इतर अनेक नाटकांचे दिग्दर्शक श्री केतन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली २ जूनपासून तालीम सुरू होत आहे. बोरो नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी याचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. या नाटकासाठी शिबिराचे आयोजन करून त्यातून कलाकारांची निवड केली असून जिल्ह्यातील 25 रंगकर्मीनी या शिबिरात भाग घेतला होता. या सर्वांच्या सहभागातून प्रतिष्ठानचे नवीन नाटक लवकरच रसिकांच्या समोर येत आहे.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली गेली 47 वर्ष सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाचे काम करत असतानाच नाट्य निर्मितीचेही काम करत आली आहे. यावर्षी संस्था गोव्याचे तरुण दिग्दर्शक केतन जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली नाट्य निर्मिती करणार असून या नवीन नाटकाच्या तालमीचा शुभारंभ व बोरोन नाटकाचा प्रयोग शनिवार दिनांक 1 जुन 2024 रोजी रात्रो 9.30 वाजता आचरेकर प्रतिष्ठान मध्ये होणार आहे.
संस्थेच्या 31व्या मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सवामध्ये फ्लेमिंगो गोवा या संस्थेचे बोरो हे नाटक सादर झाले होते या नाटकाच्या सादरीकरणानंतर अनेक रसिकांनी हा प्रयोग पाहण्याची संधी पुन्हा उपलब्ध करावी अशी प्रतिक्रिया दिली होती. ‘बोरो प्रसिद्ध दिग्दर्शक कुरोसवाच्या चित्रपटाचा आधार आहे. हे नाटक नाट्यमय असून खणखणीत राजकीय आणि सामाजिक विधान करते. या नाटकात तिथल्या मातीचे, प्रकृतीचे आणि रीतीने दर्शन आहे.असा हा सर्वांग सुंदर नाट्यप्रयोग पाहण्याची संधी प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिली असून या नाटकाची प्रवेश फी रु.100/- एवढी नाममात्र ठेवणे आली आहे.
तरी नाट्य रसिकांनी या प्रयोगाला उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष यांनी केले आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!