युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली मतदारसंघात ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ शिवसैनिकांचा “सन्मान पंधरावडा”

युवासेनाजिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतही करण्यात आले नियोजन

युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली विधानसभा युवासेने तर्फे ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान पंधरावडा आयोजित करण्यात येणार आहे. युवासेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त या ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करत त्यांनी दिलेल्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल गौरव केला जाणार आहे. जेणेकरून शिवसेना वाढि सोबतच समाजातही या ज्येष्ठ नागरिकांनी व ज्येष्ठ शिवसैनिकांनी दिलेले योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. व त्याची आठवण यानिमित्ताने केली जाणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली. कणकवलीत युवासेनेची बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने कणकवली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघ निहाय ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान पंधरावडा आयोजित केला जाणार आहे. कणकवली मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय हे सत्कार कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्य तळागाळात पोचवले जाणार आहे. त्याचबरोबर या बैठकीत येत्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतही चर्चा करण्यात आली. या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार मोठ्या मताने निवडून देण्याबाबत निर्धार करण्यात आला. या निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना सूचना देत त्यांना देखील या निवडणुकीत गाफील न राहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. तसेच युवा सेनेचे नव्याने पदाधिकारी देखील या बैठका घेणार त्यावेळी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती श्री नाईक यांनी दिली. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख मूकेश सावंत, कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, फरीद काझी, वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर, तळेरे शहर प्रमुख आदित्य महाडिक, युवासेना कणकवली समनवयक तेजस राणे, तालुका संघटक नितेश भोगले, विभागप्रमुख संतोष सावंत, रोहित राणे, भोवड आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!