कणकवली शहरात गटारातून उपसलेला कचरा गेले आठ दिवस रस्त्यावरच

कणकवली नगरपंचायत चे हेच का स्वच्छ भारत अभियान

मुख्याधिकारी पारितोष कंकाळ व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे होते दुर्लक्ष

कणकवली शहरातील पावसाळ्यापूर्वी गटारातील उपसलेला कचरा गेले आठ दिवस रस्त्यावरच ढीग करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर कणकवलीचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आला आहे. कणकवली शहरातील गटार सफाई पावसाळ्यापूर्वी करण्यात आली. मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी याबाबतची माध्यमांमध्ये माहिती देखील दिली. मात्र ही माहिती दिल्यानंतर गटार सफाई झाल्यानंतर गेले आठ दिवसाहून अधिक दिवस तेली आळी व अन्य भागात रस्त्यावर ठेवलेले कचऱ्याचे ठीग उचलण्यासाठी मात्र कणकवली नगरपंचायत प्रशासनाला मुहूर्त मिळत नाही. कणकवली शहरातील आचरा रोडवर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना हटवण्याच्या दीखावा देखील काही वेळा नगरपंचायतने केला. मात्र कलमठ सारखी ग्रामपंचायत या मच्छी विक्रेत्यांवर कडक कारवाई करत असताना मात्र कणकवली नगरपंचायत हद्दीत मच्छी मार्केट असताना देखील या रस्त्यावर मच्छी विक्रेते बसत असल्याने येथे देखील अस्वच्छता पसरत असते. मात्र याकडे देखील मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. कणकवली नगरपंचायत चे स्वच्छता निरीक्षक हे कणकवली शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी खरोखरच कार्यान्वित आहेत का? असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कणकवली तेली आळी सह अन्य भागात रस्त्यावर ठेवलेले कचऱ्याचे ठीग हे कणकवली नगरपंचायत च्या स्वच्छ भारत अभियानाचा टप्पा आहे की काय? असा देखील उद्विग्न सवाल शहरवासीयांमधून उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!