अनधिकृत वाळूउपशाबाबत मालवण तहसिलदार वर्षा झालटे यांची धडक कारवाई

तोंडवळी,वायंगणी ,भगवंतगड येथील 30रॅम्प तोडले

अवैध वाळू उपशाबाबत महसूल विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे ‌बुधवारी सायंकाळी मालवण तहसिलदार वर्षा झालटे यांच्या उपस्थितीत अनधिकृत वाळू साठ्यासाठी उभारण्यात आलेले वायंगणी सडयेवाडी येथील जांभ्या दगडाचे दोन रॅम्प, तोंडवळी मधलीवाडी येथील बारा रॅम्प,
तोंडवळी वरची (सुरुबन नजिक) आठ रॅम्प, तोंडवळी वरची येथील तीन रॅम्प आणि भगवंतगड येथील पाच रॅम्प असे एकूण तीस रॅम्प
जेसीबी च्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत तहसिलदार वर्षा झालटे यांच्या सोबत निवासी नायब तहसिलदार गंगाराम कोकरे, मंडळ अधिकारी आचरा अजय परब, तलाठी संतोष जाधव, लक्ष्मण देसाई, उज्वला वजराटकर, कोतवाल गिरीश घाडी, हरी घाडीगांवकर व वायंगणी पोलीस पाटील सुनील त्रिंबककर आदी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!