कुडाळ पर्यटन महोत्सवाला कुडाळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

ऑटो एक्स्पो/गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल/खाद्यमाहोत्सव/मनोरंजन जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी.

आज चिमणी पाखर ग्रुपचा “जलवा 2024” सांस्कृतिक कार्यक्रम.

कुडाळ/प्रतिनिधी.

कोकण नाऊ चॅनेल च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ हायस्कूल मैदान येथे कुडाळ पर्यटन महोत्सव दिनांक 16 मे पासून सुरु आहॆ.या महोत्सवाचे नियोजन अतिशय दिमाखदार असे केलेलं असून नियमित दर्जेदार असे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहॆत.या महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा,खेळ पैठणीचा,कराओके गायन स्पर्धा,स्वरसंद्या,गीत गाता चल, मुद्रा डान्स अकॅडमी प्रस्तुत नृत्य विष्कार असे दर्जेदार कार्यक्रम संपन्न झाले.तसेच या पुढील चार दिवसांमध्ये देखील अश्याच दर्जेदार कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहें.आज महोत्सवाचा सातवा दिवस आणि आजच्या दिवशी चिमणी पाखर ग्रुप आयोजित जलवा 2024 यां भव्य अश्या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहॆ.कुडाळ शहरात प्रथमच सांगितसह खेळ पैठणीचा,डॉग कॅट शो,लावणी महोत्सव आणि महोत्सवाच्या अंतिम दिवशी फॅशन शो अश्या दर्जेदार कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहॆ.
यां संपूर्ण महोत्सवला कुडाळ शहर वासियांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहॆ.सुमारे पन्नास हुन अधिक गृहपयोगी वस्तूंच्या स्टॉल चे नियोजन महोत्सवामध्ये करण्यात आले आहॆ,तसेच खाद्य महोत्सव हा कुडाळ वासियांच आकर्षण ठरलेलं बघायला मिळतो.या महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सवाचा उत्साह अधिकाधिक वाढत आहॆ.या महोत्सवाचे फक्त पाच दिवस राहिलेले असून यापुढील दिवसांमध्ये मोठ्या संख्येने कुडाळकरांनी उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आव्हाहन चॅनेल च्या वतीने करण्यात आलं आहॆ.

error: Content is protected !!