शिडवणे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार सुरु

प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

निवडणुकीला अवघे काही तास उरले असून प्राचाराचे वादळ हे वेगाने घोंगावताना आपल्याला पाहायला मिळते आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार शिडवणे गावात देखील जोरदार सुरू असून,यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना मतदारांकडे मशाल निशाणी पोचवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व आघाडीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.
माजी विभाग प्रमुख – दया कुडतडकर यांच्या नेतृत्वाखाली शिडवणे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार सुरू आहे. याच्यासह शिवसेने चे(उध्दव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचाराच्या रिंगणात उतरून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करीत आहेत.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!