वेताळ बांबर्डेत पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्या नेतृत्वाला खिंडार

कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. वेताळ बांबर्डे गावामध्ये देखील गेल्या सहा महिन्यापासून उबाठा गटाला अनेक धक्के देण्याचे काम स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी सुरू ठेवल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
लोकसभा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शनिवारी वेताळ बांबर्डे आईनमळा येथे भाजपा कार्यकर्ते बाबुराव चव्हाण यांच्या घरी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उबाठा गटाचे माजी उपविभाग प्रमुख विजय शेलार आणि त्यांचे सहकारी यांनी वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त करत तालुकाध्यक्ष दादा साईल आणि सरचिटणीस देवेंद्र सामंत यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला.
वेताळ बांबर्डे बूथ कमिटी अध्यक्ष कैलास यादव यांच्या यांच्या प्रयत्नातून हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी डॉ. जयसिंग घाडी यांनी विजय शेलार, वसंत सावंत, पांडुरंग सावंत, मंगेश सावंत, प्रमोद चव्हाण, प्रथमेश शेलार, संजय शेलार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे भाजपा परिवारामध्ये स्वागत केले.
यावेळी शक्ती केंद्रप्रमुख भास्कर गावडे, बूथ अध्यक्ष कैलास यादव, ग्रा.प. सदस्य दशरथ कदम, साजुराम नाईक, सुरेश जगताप महेश जगताप मिलिंद जगताप बाबुराव चव्हाण, आप्पा कुंभार, रवींद्र कुंभार, विजय सावंत, संतोष सावंत, प्रकाश नलावडे, राकेश नलावडे, गुरुनाथ गायकवाड, सचिन गायकवाड, मारुती सावंत, रुपेश सावंत, मंगेश सावंत, पप्या सामंत, प्रताप साटम, अक्षय चव्हाण, ओंकार सावंत आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.