निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह सिंधुदुर्ग मध्ये दाखल

खारेपाटण हायस्कूल मतदान केंद्राची केली पाहणी
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील दोन जिल्ह्याच्या मध्यस्थानी असलेल्या खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्र क्र.२६८/१९९ व २७८/२०० या दोन मतदान केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली.यावेळी मतदान केंद्रातील सी सी टी व्ही.कॅमेराची तपासणी तसेच येथील सोयी सुविधांची पाहणी देखील त्यांनी केली.व खारेपाटण हायस्कूल येथील मतदान केंद्रातील नियोजन बाबत समाधान व्यक्त केले तसेच मतदान केंद्राशी निगडित असलेल्या नियुक्त कर्मचारी वर्गाना सजग राहण्याच्या सूचना दिल्या.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज शुक्रवारी दुपारी १.३० च्या दरम्यान कणकवली तालुक्यातील खारेपाटण हायस्कूल मतदार केंद्राला तातडीची भेट देऊन येथील मतदान केंद्राची पाहणी केली.व येथील सोयी सुविधाविषयी माहिती जाणून घेतली.
यावेळी त्यांच्यासमवेत कणकवली प्रांत अधिकारी जगदीश कातकर,कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे,आदी अधिकारी उपस्थित होते.यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हा अधिकारी एम देवेंदर सिंह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी खारेपाटण शिक्षण संस्थेचे सचिव श्री महेश कोळसुलकर,खारेपाटण हायस्कूलचे मुख्याद्यापक श्री संजय सानप,शाळेचे शिक्षक राजेश वरांगे, खारेपाटण तलाठी श्रीम अरूणा जयनावर,कोतवाल श्री गुरसाळे आदी उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





