कोईल मध्ये उबाठाला धक्काशाखा प्रमुख महेश साटम यांचा तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश.

आचरा : कोईल उबाठा गटाचे शाखा प्रमुख महेश साटम यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, आचरा सरपंच जेरोन फर्नाडीस, संतोष गावकर, दिपक सुर्वे, पिंट्या पांगे, राजन पांगे, प्रशांत गावकर, संजय लोके, अमित गावकर यासह अन्य उपस्थित होते





