दहावी बारावीनंतर अनोखे करिअर- परिसंवाद विख्यात शास्त्रज्ञांचे मोफत मार्गदर्शन

विद्यानिकेतन कसाल व युरेकाचा चा उपक्रम

विख्यात संशोधक आणि आईसर पुणे येथील समन्वयक डॉ अरविंद नातू , भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ डॉक्टर विवेक पारकर , इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च चे डॉ. उदय डोंदे, प्रख्यात लेखक व नाट्यलेखक डॉ. प्रदीप ढवळ या तज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल, कसाल एस टी स्टॅंडच्याच्या मागे या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
आईसर ही विज्ञान शिक्षण व संशोधन क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य संस्था आहे व डॉक्टर नातू या संस्थेच्या स्थापनेपासून आईसर शी संलग्न आहेत. करियर मध्ये मूलभूत संशोधनाचे महत्त्व व ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यीही आईसर चा लाभ कसा घेऊ शकतात , प्रवेश प्रक्रिया यावर डॉ. नातू सर मार्गदर्शन करणार आहेत. भाभा ऍटोमिक्स सेंटर या ठिकाणी असलेल्या विविध संधी ,शिष्यवृत्ती , त्यासाठीच्या परीक्षांची करावयाची तयारी यावर डॉ .विवेक पारकर मुलांशी संवाद साधतील. मेडिसिन फिल्डमध्ये असलेल्या विविध संधी संदर्भात डॉ. उदय धोंडे सर मुलांना व पालकांना मार्गदर्शन करतील. कला, लेखन पत्रकारिता यामधील संधी संदर्भात डॉ. प्रदीप ढवळ मुलांशी संवाद साधतील. तसेच दहावी बारावीनंतर करिअरचा मार्ग निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा,विद्यार्थ्यांनी आपले करिअर (Career) निवडताना काळाचे भान ठेऊन निवड करावी. आज सर्व क्षेत्रात संधी आहेत त्या संधींचा शोध प्रत्येक विदयार्थ्याने घेतला पाहिजे. अकरावी ,बारावीतील अभ्यासक्रम त्यानंतर विविध क्षेत्रात असणाऱ्या करिअरच्या संधी त्यांची निवडक उदाहरणे व प्रवेश पद्धती याचेही मार्गदर्शन मुलांना मिळणार आहे.
आपल्या पाल्याचे संशोधन क्षेत्रातील करियर घडविण्याच्या दृष्टीने जिज्ञाशू पालकांना ही एक सुवर्णसंधी आहे.
डॉक्टर अरविंद नातू यांना संशोधक म्हणून अनेक पुरस्कार व जीवनगौरव पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे जर्मन भाषेवर प्रभुत्व असलेले डॉ. नातू जर्मनी चे शैक्षणिक राजदूत म्हणूनही कार्यरत आहेत.
आतापर्यंत त्यांनी देशभरात अनेक व्याख्याना द्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन केलेले आहे.
सिंधुदुर्गातही त्यांची आत्तापर्यंत 19 व्याख्याने झालेली आहेत व त्याचा फायदा म्हणजे आज सिंधुदुर्गातील पंधरा विद्यार्थी आईसर या नामांकित संस्थेत उच्च शिक्षण घेत आहेत व त्यातून बाहेर पडलेले आहेत.
दहावी बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी मुलांसाठी असलेल्या अनेक स्कॉलरशिप असून मार्गदर्शनाअभावी मुलांना त्याचा लाभ घेता येत नाही. याचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास गुणवंत विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन शैक्षणिक क्षेत्रात उद्भवणाऱ्या आर्थिक स्थितीवर मात करता येईल.
या सर्व तज्ञ मार्गदर्शकांचा अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे करियर निवडताना लाभ झाला असून आपणही या संधीचा ,त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ घ्यावा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनापासून वंचित राहू नये असे आवाहन विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल व युरेका सायन्स सेंटर या आयोजकामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीकरता युरेकाच्या सौ सुषमा केणी 9284035326 यांच्याशी संपर्क साधावा

error: Content is protected !!