खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने कामगार दिनानिमित्त कामगारांचा करण्यात आला विशेष सन्मान..

खारेपाटण गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनी कामगार दिनाचे औचित्य साधून
ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाचा विशेष यथोचित्त सन्मान तथा गौरव सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे करण्यात आला.
यावेळी उपसरपंच श्री महेंद्र गुरव,ग्रा.पं.सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे,किरण कर्ले,जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे,सौ.मानली होनाळे, सौ दक्षता सुतार,ग्रामविकास अधिकारी जी एस वेंगुर्लेकर, खारेपाटण ग्रामस्थ देवानंद ईवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र दिनानिमित्त खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण करण्याचा मान ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी श्री अजय तेली याना देण्यात आला. व त्यांच्या शुभभस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून खारेपाटण ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत सफाई कर्मचारी श्री संदेश मधुकर पाटणकर यांचा ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई यांच्या शुभ हस्ते शाल,श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.तर ग्रामपंचायत नळकामगार कर्मचारी श्री अजय तेली यांनी पाणी पट्टी वसुलीचे उत्कृष्ठ काम केल्याबद्दल सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शूभहस्ते त्यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.याबरोबरच खारेपाटण ग्रामपंचायतीच्या अस्थापनेतील सर्व कर्मचारी वर्गाचा देखील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी महाराष्ट्र दिनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.व कामगार दिनानिमित्त सर्व कामगाराना देखील शुभेच्छा दिल्या.या संपूर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर यांनी केले.
अस्मिता गिडाळे,खारेपाटण