घोडावत विद्यापीठातील फार्मसी विभागाच्या ४0 विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये निवड

अतिग्रे : शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल सायन्सेस मधील डी. फार्म, बी.फार्म विभागाच्या ४0 विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
दरवर्षी विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात.या वर्षी संस्थेने प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंडोको रेमेडीज लिमिटेड, ल्युपिन लिमिटेड, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मॅनव्हेट ॲनिमल हेल्थ, एफडीसी लिमिटेड, सिम्बायोसिस फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, एपिसोर्स, ल्युपिन, भारत सीरम अँड व्हॅक्सिन, टेवा वॉटसन लिमिटेड, नोवार्टिस सँडोज, फोर्ट्रिया लॅबकॉर्प, हेज अँड हेज फार्मास्युटिकल्स एलएलपी, मिस्टेअर हेल्थ अँड हायजीन प्रायव्हेट लिमिटेड, टेककेअर मेडिकल सर्व्हिसेस, कोये फार्मास्युटिकल्सएलएलपी, अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी निर्माण करून दिली. निवडलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी पॅकेज 3 लाख तर सर्वोच्च पॅकेज 4.5 लाख पर्यंत प्राप्त झाले.नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.स्वप्निल हिरीकुडे, आय यु आर संचालक प्रा.डॉ. एन.व्ही.पुजारी, ट्रेनिंग व प्लेसमेंट फॅकल्टी कोऑर्डिनेटर प्रा.सुरज कुमार पाटील यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, फार्मास्युटिकल सायन्सेस विभागा चे संचालक डॉ. सुभाष कुम्भार , फार्मसी डिप्लोमा प्रमुख प्रा.विद्याराणी खोत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!