..तर आफ्रिकेत जाऊन प्रचार करा

प्रचार काळातील बॅनर्स होत आहेत चर्चेचा विषय
सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी) – आफ्रिकन काजू वरील आयात शुल्क कमी करून भारतीय काजूवर अन्याय करणाऱ्या धोरणाविरुद्ध जिल्ह्यातील खारेपाटण वैभववाडी पासून अनेक ठिकाणी निवडणुकीच्या प्रचाराच्या ऐन-धाम धुमीत लावण्यात आलेले बॅनर हे चर्चा विषयी ठरू लागले आहेत
आफ्रिकन काजू वरील आयात शुल्क कमी करून त्यांची भरच करायची असेल तर तुमचा प्रचार आफ्रिकेत जाऊन करावा असे या बॅनर मध्ये आवाहन करण्यात आले आहे गोव्यामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यंदा काजू दुष्काळी वर्ष गोव्यात जाहीर केलेले असताना कोकणातील काजव्यावसायिकांसाठी उत्पादकांसाठी मात्र उपराठे धोरण अवलंबले जात असल्याबद्दल काजू व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे त्या पार्श्वभूमीवर हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरले आहेत