शेर्पे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार सुरु

शेर्पे गावात प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शेर्पे या गावी सुरुवात झाली असून,यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना मतदारांकडे मशाल निशाणी पोचवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व आघाडीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

मधुकर वळंजू, बाळा राऊत, ग्रा. पं सदस्य – भूषण शेलार, ग्रा. पं. सदस्य -संगीता कापसे, प्रकाश नमसे,माजी सरपंच -संजय कापसे, माजी सरपंच -धनराज शेलार, युवासेना उपाध्यक्ष -अक्षय परितकर, शाखा प्रमुख -मंदार पवार,धनाजी शेलार, संभाजी राहाटे माजी सदस्य -सुनंदा तेली, अनिता यादव, आदिनाथ नमसे
याच्यासह शिवसेने चे(उध्दव बाळासाहेब ठाकरे) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचाराच्या रिंगणात उतरून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करीत आहेत.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!