तिथवलीतील बुथप्रमुख विजय काडगे यांचा उबाठा गटाला जय महाराष्ट्र

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हाती

तिथवली गावातील विजय शंकर काडगे यांनी उबाठा गटाला  जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला आहे. तिथवली गावात उबाठा गटात बुथप्रमुख पदावर काडगे अनेक वर्ष कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. वैभववाडी भाजपा कार्यालयात आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत श्री काडगे यांनी प्रवेश केला आहे.
 विजय घाडगे गेली अनेक वर्ष कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित होते. परंतु मोदी सरकारच्या माध्यमातून झालेली प्रगती व होणारा गतीमान विकास यावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे.
 यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे , माजी सभापती अरविंद रावराणे भालचंद्र साठे व पदाधिकारी उपस्थित होते.

वैभववाडी प्रतिनिधी

error: Content is protected !!