वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथील उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणेंचे ठाकरे गटाला धक्कातंत्र सुरूच

वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथील उभाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्ते मुरारी आकाराम शिंदे, वैभव मुरारी शिंदे, मंगेश शिंदे, आनंद शिंदे, संजय शिंदे, अनंत शिंदे, सुधाकर शिंदे, दत्ताराम मोरे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सोनाळी गावातील मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले.

उपस्थित अरविंद रावराणे,नासिर काझी, समाधान जाधव, प्रकाश शेलार, संतेश रावराणे,आदि भाजप उपस्थित होते.

वैभववाडी प्रतिनिधी

error: Content is protected !!