जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा शाळा प्रवेशोत्सव संपन्न

दि. ३०/०४/२०२४ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा या उपक्रमांतर्गत शाळा प्रवेशोत्सव घेण्यात आला . इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.तसेच इयत्ता सातवीतून इयत्ता आठवीत जाणाऱ्या कु.सृष्टी गजानन कोलते व सुयश दशरथ वाघरे इ.७ वी या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या . तसेच जिल्हा परिषद शाळा चिंचवली मधलीवाडी येथे कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. योगिनी सुहास रानडे मॅडम यांचा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. सूर्यकांत भालेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला . तसेच स्वयंसेवक श्रीम. प्रियांका अनिल खोत यांचा आहे शाल व श्रीफळ तथा भेटवस्तू देऊन शाळा समितीच्या अध्यक्षा सौ.साक्षी श्रीकृष्ण भालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी पदी निवड झालेले शाळेचे उपशिक्षक श्री.अमोल विलास भंडारी यांचाही शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.सविता गजेंद्रसिंग पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच शिक्षक पालक संघ व माता पालक संघ संघाचे सन्मा. सदस्य व पालक उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक , उपस्थित मान्यवर व सत्कारमूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सविता पवार उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





