शिवसेना ठाकरे गट, इंडिया आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा हळवल येथे शुभारंभ

मतदारांकडून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी हळवल येथे सुरुवात आज करण्यात आली. यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. मतदारांकडे मशाल निशाणी पोचवण्यासाठी शिवसैनिक व आघाडीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.यावेळी उपतालुकाप्रमुख राजू राणे,युवासेना विभागप्रमुख रोहित राणे,मुख्य शाखाप्रमुख अनंत राणे,काँग्रेस चे कमलाकर तांबे,प्रभाकर चव्हाण, सुभाष परब,विजय परब,दिलीप परब,पप्पू परब,नीलेश ठाकूर,हे प्रचारात सहभागी झाले.
कणकवली प्रतिनिधी