नारायण राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक साकेडी मध्ये

मुस्लिमवाडीतील ग्रामस्थांची भेट घेत केली चर्चा
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील साकेडी येथे महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ साकेडी – मुस्लिमवाडी मधील ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर,शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, केदार खोत, माजी उपसरपंच जहुर शेख, अकबर शेख, अझहर शेख, दिलदार शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी





