कणकवली तालुक्यातील लोरे नं.२ येथील उबाठा गटाचे ग्रामपंचायत सदस्य विजय मांडवकर यांच्यासह युवासेना अमोल गोरुले यांनी केला भाजप पक्षांमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश
कणकवली तालुक्यातील लोरे नं२ येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते विजय मांडवकर व अमोल गोरुले यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून लोरे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले.
उपस्थित आमदार नितेश राणे, दिलीप राव राणे, बंटी राव राणे आदि भाजप उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी