खारेपाटण येथे महायुतीकडून नारायण राणे यांचा झंझावती प्रचार सुरु

कणकवली विधान सभा प्रमुख खारेपाटण विभाग निरीक्षक संदेश पटेल यांनी खारेपाटण येथील प्रचाराचा आढावा घेत उतरले प्रचार रिंगणात
लोकसभा निवडणुकीच्या खासदारकीचे महायुतीचे उमेदवार भाजपाचे नारायण राणे यांचा खारेपाटण मध्ये झंझावाती प्रचार सुरु आहे.खारेपाटण येथील सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रचाराच्या रिंगणात उतरून नारायण राणे यांचा प्रचार करत आहेत. नुकतेच विधानसभा प्रमुख संदेश पटेल आणि युवा जिल्हा प्रमुख प्रमुख सुकांत वरुणकर यांनी खारेपाटण येथे भेट देत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा आढावा घेतला. यावेळी त्यानी शिवसेना कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले व भाजपाच्या पदाधिकारी यांच्या भेटी घेत चर्चा केली. यानंतर ते प्रचारत ही सहभागी झाले. या वेळी तालुका प्रमुख शरद वायंगणकर, उप तालुका प्रमुख मंगेश गुरव,कृषी समिती सदस्य मंगेश ब्रम्हडांदे ,यांच्या सह सरपंच प्राची इसवलकर व ग्राम. प . सदस्य गुरुप्रसाद शिंदे अस्थाली पवार यांच्या सह शिवसैनिक व तसेच पं. स. सदस्य -तृप्ती मालवदे, उपसरपंच -महेंद्र गुरव, राजू वरुणकर,शेखर शिंदे व इतर सर्व भाजपा पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य हे खारेपाटण येथे प्रचारात सहभागी झाले होते. खारेपाटण येथे महायुतीला अनुकूल वातावरण असून चांगले मताधिक्य मिळेल असे यावेळी विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण