खारेपाटण जिल्हा परिषद विभागातील शेर्पे मुस्लिम बांधवांचा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना जाहीर पाठींबा

माझी जि प सदस्य बाळा जठार यांच्या पुढाकारातून घेण्यात आली बैठक

माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार यांच्या समवेत उपस्थितीत शेर्पे मुस्लिम वाडीत सभा घेण्यात आली. या सभेला वारगाव माजी उपसरपंच इरफान मुल्ला, कुरंगावणे उपसरपंच बबलू पवार, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये याच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. विविध विकास कामासंर्दभात चर्चा झाली या चर्चातून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा नारायण राणे यांना जाहीर पाठींबा देण्याचे एकमताने ठरविण्यात आले यावेळी शेर्पे मुस्लिम वाडीतील शाबान रमदूल,रूबी मुजावर, उमर रमदूल, शाबान मुजावर आदी वाडीतील मुस्लिम बांधव उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!