शिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची उद्या माणगावात जाहिर प्रचार सभा

खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ करण्यात आले आहे आयोजन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- इंडिया – महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची भव्य जाहिर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि. २७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील मनोहर मंगल कार्यालय येथे हि प्रचार सभा होणार आहे.

यावेळी शिवसेना उपनेते,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकणच्या उपनेत्या जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट व इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. नितीन बानुगडे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी जाहिर सभेस शिवसैनिकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!