येत्या काळात साळीस्ते मधील विकास कामे मार्गी लावू!

आमदार नितेश राणे यांची साळीस्ते – ताम्हणकरवाडी ग्रामस्थांना ग्वाही

गेली पंधरा वर्षे साळिस्ते ताम्हणकर वाडी येथे विकास कामे रखडल्या मुळे वाडीतील ग्रामस्थांना खुप त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात वाडीतील प्रमुख रस्तावरून ग्रामस्थांना चालणे ही कठीण होते. साळिस्ते ग्रामपंचायतीची मुख्य नळयोजनेची टाकी खुप लांब असल्याने वाडीमधे पाण्याचा प्रवाह कमी स्वरूपाचा असल्यामुळे काही घरांना कमी प्रमाणात पाणी मिळते. आदी समस्यांबाबत जि. प. माजी सदस्य बाळा जठार व माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या सोबत आमदार नितेश राणे यांची ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. ग्रामस्थांच्या समस्या आमदार नितेश राणे यांच्या लक्षात येताच नितेश राणे यांनी साळिस्ते ताम्हणकर वाडी ग्रामस्थांच्या समस्या व संपूर्ण रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यावर ताम्हणकर वाडी ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या कायम पाठीशी ठाम उभे राहण्याचे वचन दिले. व आभार मानले. यावेळी माजी बुथ कमीटी अध्यक्ष उदय बारस्कर खारेपाटण जि.प.विभाग मागासवर्गीय सेल अध्यक्ष मा मंगेश कांबळे शिडवणे सरपंच रवी शेट्यें, खारेपाटण प.स. शक्ती प्रमुख सूर्यकांत भालेकर, ग्रामस्थ समीर ताम्हणकर, सुनील ताम्हणकर, सचिन ताम्हणकर, निखिल ताम्हणकर, प्रदिप ताम्हणकर,दिपक ताम्हणकर, नरेंद्र ताम्हणकर, आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!