गाबीत समाजातील आयपीएस अधिकारी कु.सायली धूरत यांना “गाबीत भूषण”पुरस्काराने सन्मान प्रदान

दांडी – मालवण येथील “गाबीत महोत्सवाचे” निमित्त साधून महाराष्ट्र राज्यातील गाबीत समाजातील विविध उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी,राष्ट्रीय खेळाडू,डॉक्टर्स, वयोवृध्द सुप्रसिध्द कलाकार,यांचा गाबीत समाज संस्थेतर्फे “गाबीत भूषण”पुरस्काराने सत्कार करण्यात आला होता.सदरील कार्यक्रमास त्या आपल्या शासकीय व्यस्त कामामुळे उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.म्हणून अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर,गाबीत समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री.सुजय धूरत,सरचिटणीस श्री.बाळा मणचेकर,समाज बांधव श्री.मणचेकर यांनी मुंबई येथे कू.सायली धूरत यांची भेट घेऊन त्यांना “गाबीत समाज भूषण” पुरस्कार देऊन सन्मानित केले.तसेच त्यांना महाराष्ट्रातील विविध गाबीत समाज संस्थांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.
कणकवली प्रतिनिधी





