मंगळवार 23 एप्रिल रोजी तळेरे येथे मोफत मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शिबिर

नॅब नेत्र रुग्णालय मिरज संचालित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली तसेच सुमन मेडिकल स्टोअर तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत तळेरे येथे मोफत नेत्र तपासणी निदान तसेच मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
मोफत नेत्र तपासणी व निदान मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर मोफत बीपी व शुगर तपासणी शिबिर असे या शिबिराचे स्वरूप आहे
याच शिबिरात सहभागी होण्यासाठी हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक 99 22 64 28 59 किंवा 98 50 84 93 15 असा आहे
तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे





