हनुमान जयंती शताब्दी महोत्सवानिमित्त आचरा पिरावाडी येथे विविध कार्यक्रम

२१ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान आयोजन

आचरा पिरवाडी येथील श्री तरुण संघ दक्षिणवाडा तर्फे हनुमान जयंती शताब्दी महोत्सव दिनांक २१ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान साजरा होणार आहे त्यानिमित्त रविवार २१ एप्रिल रोजी सकाळी हनुमान मूर्तीवर अभिषेक सकाळी साडेनऊ वाजता सभा मंडपाचे उद्घाटन , दहा वाजता श्रीकृष्ण मंदिर दक्षिणवाडा येथे श्री सत्यनारायण महापूजा . सकाळी 10:45 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी आचरा मर्यादित चित्रकला स्पर्धा . दुपारी महाप्रसाद रात्री हनुमान जयंती शताब्दी सोहळा कार्यक्रमाचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ मधुमती निकम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे .यावेळी रामेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी,आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव अँड अक्षय सावंत अशोक सारंग , नारायण कुबल, अशोक कांबळी ,रामेश्वर विद्यामंदिर पिरावाडी चेअरमन डॉ प्रमोद कोळंबकर, मुख्याध्यापक रणजीत बुगडे, सुभाष धुरी, दीनानाथ धुरी आदी उपस्थित राहणार आहेत रात्री नऊ वाजता श्री हनुमान जयंती शताब्दी महोत्सव स्मरणिका प्रकाशन वार्षिक पारितोषिक वितरण, शिष्यवृत्ती वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत .तसेच स्थानिक व मुंबई कर यांच्या तर्फे करमणूक कार्यक्रम होणार आहे. सोमवार 22 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता शालेय मुलांसाठी मनोरंजन खेळाचे कार्यक्रम ,दहा वाजता दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा गृहातील मुलांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.यासाठी प्रमुख उपस्थिती वायंगणी हायस्कूल माजी मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर, कोम साप मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर ,हुतात्मा दत्ताभाऊ कोयंडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नित्यानंद तळवडकर, हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा मुख्याध्यापक सुभाष नाटेकर ,मुरलीधर कोळंबकर आदी उपस्थित राहणार आहेत दुपारी तीन वाजता महिलांसाठी स्पर्धा, रात्री भव्य पालखी मिरवणूक तसेच सत्कार समारंभ, साडेदहा वाजता संस्कृती कला संवर्धन मुंबई प्रस्तुत नृत्य आणि अभिनयाचा कलाविष्कार कलारंग कार्यक्रम होणार आहे.मंगळवार 23 एप्रिल रोजी पहाटे हनुमान जन्म सोहळा, दुपारी सत्यनारायण महापूजा महाप्रसाद सायंकाळी चार वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ रात्री नऊ वाजता हनुमान जयंती शताब्दी महोत्सव सोहळा सांगता समारंभ इप्रमुख उपस्थिती चंद्रकांत कुबल, शरद धुरी अध्यक्ष ग्रामस्थ सभा मधला वाडा राधाकृष्ण देवस्थान अध्यक्ष अनिल करंजे, दिनकर कुबल, प्रकाश तोडणकर, दिनानाथ धुरी आदी उपस्थित राहणार आहेत. रात्री ९.३० वाजता राजयोग धुरी,कु प्रिती कुबल, यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.तर रात्री १० वाजता बुवा विनोद चव्हाण विरुद्ध बुवा गुंडू सावंत यांच्या मध्ये डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री तरुण संघ दक्षिण वाडा कडून करण्यात आले आहे.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!