इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रविवारी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी कॉर्नर सभा

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे शिवसेना इंडिया आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहाण्याचे आवाहन
संतोष हिवाळेकर पोईप शिवसेना इंडिया आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा. श्री.विनायकजी राऊत साहेब यांची रविवारी दि. 21 एप्रिल 2024 रोजी विविध ठिकाणी कॉर्नर सभा
यावेळी उपस्थित शिवसेना उपनेते तथा कोल्हापूर-सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख मा.श्री. अरुण दुधवडकर, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख श्री. भाई गोवेकर, शिवसेना उपनेते श्री. गौरीशंकर खोत, लोकसभा समन्वयक श्री. प्रदीप बोरकर, आमदार श्री. वैभव नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. संदेश पारकर , उपनेते तथा शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ. जान्हवी सावंत, कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख श्री.संग्राम प्रभुगांवकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा युवतीसेना जिल्हा विस्तारक कु. रुची राऊत, युवासेना विस्तारक श्री.गितेश राऊत, युवासेना जिल्हा प्रमुख श्री. मंदार शिरसाट* यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रचार सभेचे यांच्या आयोजन केले आहे तरी सर्व इंडिया आघाडीचे पदाधिकारी , शिवसेना, युवासेना – युवतीसेना पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी, शिवसैनिक-युवासैनिक, कार्यकर्ते, शिवसेना प्रेमी, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे.
सभेची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे:
आचरा विभाग- वेळ- सकाळी ठिक 11 वा. स्थळ- आचरा तिठा
पोईप विभाग- वेळ- दुपारी ठिक 3.30 वा. स्थळ- पोईप तिठा
पेंडुर विभाग- वेळ- संध्याकाळी ठिक 6 वा. स्थळ- कट्टा बाजारपेठ
देवबाग विभाग- वेळ-रात्री ठिक 8 वा. स्थळ-तारकर्ली काळेथर(डोबातील मैदान)