जय भीम युवक मंडळ आंबडपाल आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी

जय भीम युवक मंडळ आंबडपाल आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऍड. रजत विनायक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विश्वातील सर्वोत्तम संविधान लिहून सर्वांना प्रगतीचा मार्ग खुला करून देणाऱ्या क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा वापर सत्याच्या मार्गाने करा असे ऍड रजत चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी सखाराम आंबडपालकर, ग्रामपंचायत सदस्य अभय जाधव, स्मिता नाईक, शुभम सावंत, महेंद्र नाईक, सरपंच महेश मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संतोष सावंत, माजी उपसरपंच अनुष्का जाधव, काका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी, कुडाळ

error: Content is protected !!