साकेडीत पुतण्या कडून काकावर कोयत्याने खुनी हल्ला

जमिनीतील कुंपण तोडत असल्याच्या रागातून शिवीगाळ करत हल्ला

कणकवली पोलिसात पुतण्यावर गुन्हा दाखल

सार्वजनिक जमिनीतील कुंपण का तोडत आहात असे विचारल्याच्या रागातून पुतण्याने काकाला कोयत्याने मारत शिवीगाळ केली. याप्रकरणी प्रकाश लक्ष्मण दळवी (६६, रा. साकेडी बोरीचीवाडी) यांच्या फिर्यादीवरून पुतण्या जितेंद्र सदानंद दळवी याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रकाश दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी शुक्रवारी सकाळी आमच्या सार्वजनिक जमिनीत गेलो असता भाऊ सदानंद दळवी व त्यांचा मुलगा जितेंद्र दळवी हे तेथील कुंपण तोडत होते. या संदर्भात सदानंद दळवी यांना विचारले असता कुंपण तोडून मला येथे रतांब्याची झाडे लावायची आहेत असे सांगितले. त्यादरम्यान जितेंद्र दळवी हा तेथे येत तू माझ्या बाबाना बोलणारा कोण असा विचारत अंगावर धावत येत हातातील कोयता उलटा करून पायावर मारला. त्यानंतर कोयत्याची लाकडी मूठ डोक्यावर मारून दुखापत केली. तसेच उजव्या हाताच्या मनगटाला चावला. त्याचप्रमाणे जितेंद्र याने शिवीगाळ करत तुला काय ते दाखवतो अशी धमकी दिली.या झटापटीत प्रकाश दळवी यांच्या उजव्या पायाच्या बोटाला कोयता लागून दुखापत झाली आहे. प्रकाश दळवी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!