लहान मुलांना दत्तक घेऊन त्यांची विक्री करणारी टोळी जिल्ह्यात कार्यरत!

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर संघटनेकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन

सिंधुदूर्ग जिल्हात लहान मुलांना दत्तक देवून त्यांची विक्री करणारी टोळी कार्यरत आहे. गरजू पालकांचा शोध घेवून त्यांच्यापर्यत जावून त्यांच्या भावनिक पणाचा बुरखा पांघरून त्या पालकांना दत्तक म्हणुन मूल देऊन त्याच्याकडुन लाखो रूपये हडप केले जातात. या दत्तक देणे प्रकरणात कोणते ही कायदेशीर कागदपत्र केली जात नाहीत. कालांतराने हि टोळी त्या पालकांवरच मुले अपहरणाची तक्रार करतात. आणि त्या पालकांना परत लाखो रुपयांचा गंडा घालतात असे प्रकार सिंधुदूर्ग जिल्हात घडत आहेत. अशा आशयाची तक्रार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर संघटनेकडून पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे करण्यात आली आहे. सदरची टोळी मुले कोठून आणतात आणि ती एक वर्षाची मुले मुली सिंधुदूर्ग जिल्हात विक्री करतात या मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा तपास करून सर्व तस्करी करणाऱ्या टोळींना अटक करून संबधित आय. पी.सी प्रमाणे गुन्हे दाखल करावे अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, सचिव विष्णू चव्हाण, सहसचिव ॲड मोहन पाटणेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष संदीप सुकी, कुडाळ तालुका अध्यक्ष आर के सावंत, सदस्य आनंद कांडरकर,परेश परूळेकर,मनोज तोरस्कर,निसार शेख आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!